Header Ads

दिलासा : १०४ पैकी ५६ रुग्ण ठणठणीत बरेउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली असली तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यातील एकूण १०४ पैकी ५६ रुग्ण बरे झाले असून, उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या ४५ आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. 

देशभर कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात सुरुवातीला तीन रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर ते रुग्ण बरे झाल्यानंतर तब्बल ३७ दिवस उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता, त्यानंतर ११ मे पासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत चालले असून, केवळ २५ दिवसात १०१ रुग्ण आढळून आले असून, दिवसाला सरासरी चार रुग्ण आढळून येत आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - १०४
एकूण बरे झालेले  रुग्ण - ५६
उपचार घेत असलेले रुग्ण -४५
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३

पाहा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण ? 


No comments