कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यतील सात पॉजिटीव्ह



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील सात  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  उस्मानाबाद तालुक्यातील तीन,  तुळजापूर तालुक्यातील दोन  आणि उमरगा तालुक्यातील दोन रुग्ण आहेत. 



आज २९ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून ५९  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात  पॉजिटीव्ह , एक अनिर्णित, एक रद्द आणि व ५०  निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.
 

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी उस्मानाबाद येथील एमआयडीसी भागातील तीन , तुळजापूर शहरातील एक आणि काटगाव येथील  एक तसेच बालाजीनगर, उमरगा येथील दोन रुग्ण आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यात

कोरोना बाधित रुग्ण - २१७ 
बरे झालेलं रुग्ण - १६८ 
मृत्यू - १० 
ऍक्टिव्ह रुग्ण ३९ 



व्हिडीओ न्यूज पाहा 








No comments