Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा  येथील कोरोना बाधित महिलेचा आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात  मृत्यू झाला.उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यत १७७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असुन १३२ रूणांनी कोरोनावर मात केली आहे . सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता मात्र आज मुंबई येथुन आलेल्या माळुंब्राच्या  ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने मृतांचा आकडा ७ वर पोहचला आहे .या महिलेस कोरोनासोबतच रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता .


आज रोजी ३८ कोरोना बाधीत रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . राजाभाऊ गलांडे यांनी दिली .

एकूण कोरोना बाधित रुग्ण -177
बरे झालेले रुग्ण 132
मृत्यू -7
एक्टिव्ह रुग्ण - 38


2 comments

Unknown said...

No cash

Unknown said...

Please chase mi to acount