Header Ads

धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ११ रुग्ण वाढले @ ८८



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील ८, कळंब शहरातील २ आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील एक अश्या ११ जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता ८८ झाली आहे.


आज दि. २ जून  रोजी 55 स्वाबचे रिपोर्ट  प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे  रिपोर्ट  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत. एक  जणांचा रिपोर्ट  inconclusive आला आहे. 



पॉजिटीव्ह  पेशंटची  माहिती 

8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद  येथील असून ते नळदुर्ग  येथील पूर्वी पॉजिटीव्ह  आलेल्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत.

2 रुग्ण   कळंब  येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत  व  एक रुग्ण  शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील पानटपरी चालकाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा भागातील एकाच कुटुंबात तब्बल ८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, यामध्ये टपरीचालकाच्या आई, मुलगी, बहीण, जावयाचा समावेश आहे. प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन हा परिसर दुपारीच सील केला. 

उस्मानाबाद शहरात १६ रुग्ण 

उस्मानाबाद शहरात यापूर्वी ८ रुग्ण होते, त्यात आणखी आठ जणांची भर पडल्याने एकूण रुग्ण हे १६ झाले आहेत.




उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी ७७ रुग्ण होते, त्यापैकी ३ मयत झाले असून, ३२ जण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आता ५३ झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88
एकूण बरे झालेले  रुग्ण - 32
उपचार घेत असलेले रुग्ण - 53
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3




No comments