Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात पाच रुग्णाची भर



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला असून सर्व रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत. त्यात तीन रुग्ण सलगरा ( दिवटी ), एक रुग्ण माळुंब्रा आणि एक रुग्ण नळदुर्ग येथील आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील ३७ जणांचा स्वाब आज  तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , लातूर येथे पाठविण्यात आला होता.  सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पाच  पॉजिटीव्ह असून, 32 निगेटिव्ह आहेत. 

पॉजिटीव्ह रुग्णात तीन रुग्ण  सलगरा (दिवटी ) येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. एक रुग्ण माळुंब्रा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहे. व एक रुग्ण  नळदुर्ग येथील असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहे. सर्व रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.


एकूण बाधित रुग्ण - १६५ 
बरे  झालेले रुग्ण - १२७ 
मृत्यू पावलेले रुग्ण - ६
ऍक्टिव्ह रुग्ण - ३२


No comments