Header Ads

कोरोना : सुंभा येथील आणखी एक पॉजिटीव्ह @ ७७


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७७  झाली आहे.



उस्मानाबाद जिल्हयातील ४३   व्यक्तींचे स्वॅब  काल तपासणीसाठी आले होते , त्यापैकी ३७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एक व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे तर ४ अहवाल प्रलंबित आहेत.

आज जो रुग्ण पॉजिटीव्ह आला आहे, तो सुंभा  ता. उस्मानाबाद येथील ३० वर्षीय पुरुष आहे.



कोरोनाचा तिसरा बळी 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 77
एकूण बरे झालेले  रुग्ण - 27
उपचार घेत असलेले रुग्ण - 47
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3

No comments