Header Ads

पारगांव दरोड्यातील दोन आरोपी अटकेतपो.ठा. वाशी: दि. 14.06.2020 रोजी मध्य रात्री मौजे पारगांव येथील अरुण मोटे, कालिंदा मोटे यांना अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण केली होती. यावरुन वाशी पो.ठा. येथे गु.र.क्र. 174/2020 हा भा.दं.वि. कलम- 394 नुसार दाखल आहे. सदर गुन्हा तपासात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पो.ठा. चे पो.नि. श्री. उस्मान शेख, सपोनि श्री अशोक चव्हाण, सपोनि श्री. के.पी. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली. आरोपी हे ईट येथे येणार असल्याची गोपनीय खबर मिळाल्यावरुन दि. 16.06.2020 रोजी ईट येथे सापळा लावण्यात आला. यावेळी वाशी पो.ठा. चे पोना- महादेव राऊत, पोकॉ- नितीन जाधवर, गोपीनाथ पवार यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी 1)सचिन अंकुश पवार 2)उमेश नाना पवार दोघे रा. लोनखस पारधी पिढी यांना पकडले. सदर दरोडेखोरांची पोलीस कोठडी घेण्यात आली असुन उर्वरीत तपास वाशी पो.ठा. चे सपोनि श्री अशोक चव्हाण हे करत आहेत.

मनाई आदेश झुगारुन उपोषण- आंदोलन केले, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, उमरगा: कोविड- 19 रोगाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून जिल्हाभरात गर्दी निर्माण करण्यास, रस्ता रोको, उपोषण, मोर्चा इत्यादी आंदोलनास मनाई आहे. असे असतांनाही हा मनाई आदेश झुगारुन दि. 17.06.2020 रोजी 11.00 वा. चे पासून तहसील कार्यालय, उमरगा येथे सुरेश भिवा कांबळे, रा. मुरुम, ता. उमरगा हे पत्नी- सुनीता, आई- अंदाबाई, मुलगा- प्रशांत यांसह उपोषणास बसले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 21 वाहने जप्त.”

पो.ठा. कळंब: लॉकडाउन असतांनाही दि.16.06.2020 रोजी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन, जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर फिरणाऱ्यांची 21 वाहने पो.ठा. कळंब यांनी ताब्यात घेतली आहेत.

No comments