Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखलनळदुर्ग: पापा बळी सगट, रा. वडगाव (देव), ता. तुळजापूर यांसह त्यांची पत्नी- लक्ष्मी व आई- प्रयागबाई अशा तीघांना दि. 21.06.2020 रोजी 20.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर गावातीलच- सुशिल गवळी, सुंदर गवळी, उषा गवळी या तीघांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी बतईने, दगड- काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुशिल गवळी यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.

नळदुर्ग: विजय लिंबाजी मुळे, रा. सलगरा (दि.), ता. उस्मानाबाद हे त्यांचा मुलगा- सचिन यासह दि. 24.06.2020 रोजी 16.00 वा. सु. मौजे सलकरा (दि.) येथील आपल्या शेतातील सामाईक बांधाने जात होते. यावेळी भाऊबंद- पवन नाना मुळे, बाबा मुळे, देवानंद मुळे, जनाबाई मुळे या चौघांनी रहदारीच्या कारणावरुन विजय मुळे व त्यांचा मुलगा- सचिन या दोघांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजय मुळे यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 25.06.2020 रोजी नोंदवला आहे.

 कळंब: अलिम शौकत बागवान, रा. शेरे गल्ली, कळंब हे दि. 02.05.2020 रोजी 14.00 वा. सु. बागवान चौक, कळंब येथे फळ विक्री करत होते. यावेळी भाऊबंद- महंमद बागवान, बबलु बागवान, सोहेल बागवान, बशीर बागवान या चौघांनी फळ- भाजीपाला विक्री करण्याच्या कारणावरुन अलिम बागवान यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अलिम बागवान यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments