Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखलतुळजापूर: महादेव ज्ञानदेव कदम, रा. चिंचोली, ता. तुळजापूर हे दि. 19.06.2020 रोजी 08.00 वा. सु. मौजे चिंचोरी येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी भाऊबंद- निवृत्ती कदम, निलेश कदम, भिमा कदम, मधुकर कदम या सर्वांनी महादेव कदम यांच्या शेतात येउन शेतजमीन मोजण्याच्या कारणावरुन महादेव कदम यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. मुलास होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या मुद्रीका यांनाही नमूद चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव कदम यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघां विरुध्द गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.

तुळजापूर: सदाशिव बब्रुवान सरडे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 13.06.2020 रोजी 09.30 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर थांबले होते. यावेळी सदाशिव सरडे यांचे नातू- दिपक व  यश या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून आजोबा- सदाशिव सरडे यांना शिवीगाळ करुन, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सदाशिव सरडे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.

 तुळजापूर: संपत दादाराव चोरमले, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर यांनी दि. 23.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे सिंदफळ येथे भाऊबंद- राम भारत चोरमले यांना शेतातील सामाईक बांध फोडल्याचा जाब विचारला. यावर चिडून जाउन राम चोरमले यांसह लखन चोरमले, भारत चोरमले, सुवर्णा चोरमले या सर्वांनी संपत चोरमले यांना काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच लखन चोरमले यांनी संपत चोरमले यांची स्विफ्ट डिझायर कार च्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या संपत चोरमले यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.

नळदुर्ग: निळकंठ लक्ष्मण घोडके, रा. अणदूर, ता. तुळजापूर हे आपल्या कुटूंबातील सदस्य- शिवाजी, वैष्णवी, लक्ष्मी यांना दि. 22.06.2020 रोजी सायंकाळी 17.00 वा. सु. मौजे अणदूर येथील त्यांच्या शेतात भाऊबंद- अरवींद बाबुराव घोडके, दिपक घोडके, वर्षा घोडके, आदित्य घोडके, अजिक्य घोडके या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून निळकंठ घोडके यांसह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या निळकंठ घोडके यांनी वैद्यकीय उपचारानंतर दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments