Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, कळंब: समद अल्लाबक्ष शेख, रा. बाबानगर, कळंब यांच्या कळंब ते येरमाळा रस्त्यालगत असलेल्या सम्राट हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या कुक्‍कुटपालन शेडमधील प्रत्येकी 255/-रु. 200 कोंबड्या असा एकुण 51,000/-रु. च्या दि. 29.06.2020 रोजी 00.55 वा. सु. अविनाश होके, रा. नायगाव, ता. केज व अन्य तीघांनी चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या समद शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद संबंधीत चौघांविरुध्द गुन्हा पो.ठा. कळंब येथे नोदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: मनोज रमाकांत सावंत, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांनी त्यांची पल्सर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 डीएच 2795 ही दि. 28.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या घरा समोर लावली होती. ती सकाळी लावलेल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मनोज सावंत यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments