Header Ads

चोरलेल्या 7 दुचाकींसह 2 अल्पवयीन युवक ताब्यात
उस्मानाबाद - उस्मानाबाद आनंदनगर पोलीस स्टेशन  हद्दीतुन चोरलेल्या 7 दुचाकींसह 2 अल्पवयीन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन व. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कळंब व उस्मानाबाद येथील 2 अल्पवयीन युवकांना (विधी संघर्षग्रस्त) आज दि. 29.06.2020 रोजी ताब्यात घेतले. त्या दोघांच्या ताब्यातून सन- 2020 मध्ये आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी केलेल्या 1,45,000/-रु. किंमतीच्या 7 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. दोघे अल्पवयीन युवक किल्ली वाहनांना लाउन खात्री करत असत. ज्या वाहनास किल्ली लागत असे ते वाहन घेउन पोबारा करत असत.

त्या जप्त दुचाकींची माहिती खालील प्रमाणे

1) गु.र.क्र. 152/2020 मधील स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. 13 एफ 0185.
2) गु.र.क्र. 163/2020 मधील स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 9923.
3) गु.र.क्र. 167/2020 मधील पल्सर मो.सा. क्र. एम.एच. 12 सीएम 6654.
4) गु.र.क्र. 174/2020 मधील अपाचे मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1407.
5) गु.र.क्र. 183/2020 मधील पल्सर मो.सा. क्र. एम.एच. 12 डीएच 2795.
6) गु.र.क्र. 184/2020 मधील पॅशन प्रो मो.सा. क्र. 25 एस 9655.
7) गु.र.क्र. 185/2020 मधील स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. 25 एबी 8677

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख, पोउपनि  पांडुरंग माने,पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, वलीउल्ला काझी, पोना- शेळके, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कुनाल दहीहांडे, पोकॉ- गणेश सर्जे, अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.  

No comments