Header Ads

नळदुर्ग : सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुन- अंबिका युवराज मुळे, वय 25 वर्षे, यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1) युवराज संजु मुळे (पती) 2)संजु मुळे (सासरा) 3)गुंडाप्पा मुळे (सासु) 4)यल्लाम्म मुळे (नणंद) 5)दिगंबर मुळे (दिर) 6) अंबिका मुळे (जाऊ) 7) नागम्मा छनुरे 8) छकुली संकोळे, सर्व रा. इंदीरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर यांनी मागील 4 वर्षापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तसेच माहेरहुन पैसे न आणल्याच्या कारणावरुन घरा बाहेर हाकलून दिले. त्यांच्या या त्रासास कंटाळून दि. 27.06.2020 रोजी नळदुर्ग जवळील अलीयाबाद पुलातील पाण्यात उडी मारुन अंबिका मुळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या संजय मुगलप्पा संकोळे (मयताचे पिता) यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 306, 34 सह हुंडाबंदी अधिनियम कलम- 3, 4 अन्वये गुन्हा दि. 27.06.2020 रोजी नोंदवला आहे.


चोरी.
पोलीस ठाणे, ढोकी: नेताजी देवकर, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 26 डी 2222 ही दि. 27.06.2020 रोजी रात्री राहत्या घरा समोर ठेवली होती. ती सकाळी ठेवल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्यान चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments