Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, नळदुर्ग: गुरुसिध्दअप्पा आनंदराव मुळे व अन्य 2 व्यक्ती सर्व रा. बोरगांव, ता. तुळजापूर यांचा मौजे जळकोट, ता. तुळजापूर येथील रहीवाशी- दत्तात्रय बाजीराव कदम व अन्य 2 व्यक्ती यांच्यात शेतजमीनीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 29.06.2020 रोजी 11.00 वा.सु. मौजे बोरगांव शिवारातील शेतात वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोळ्यात मिरची पुड टाकून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. नळदुर्ग येथे दि.29.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, भुम: शंभु उत्रेश्वर शेळके, रा. वाकवड, ता. भुम हे दि. 23.06.2020 रोजी 13.00 वा. सु. मौजे वाकवड येथील आपल्या शेतात शेताची मशागत करत होते. यावेळी गावातीलच भाऊबंद- बिभीषण शेळके, सचिन शेळके, मच्छिंद्र शेळके, गोरख शेळके, बाजीराव शेळके, प्रदीप शेळके, सुकशाला शेळके व अन्य दोन व्यक्ती या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून शंभु शेळके यांच्या शेतात जाउन शेत मशागतीच्या कारणावरुन शंभु शेळके यांसह बहिण- अर्चना व चुलत भाऊ- भारत यांना शिवीगाळ करुन, लोखंडी सळई, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या शंभु शेळके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे,तुळजापूर: श्रीमती शाहु राजेंद्र राठोड, रा. दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर या दि. 11.06.2020 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहत्या घराच्या कुंपनाच्या भितीचे बांधकाम करुन घेत होत्या. यावेळी शेजारील- चंद्रकांत राठोड, शारदाबाई राठोड, सचिन राठोड, किशोर राठोड या चौघांनी कुंपनाच्या कारणावरुन  श्रीमती शाहु राठोड यांसह त्यांचे पती- राजेंद्र राठोड यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीमती शाहु राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: भागवत नारायण काकडे, रा. पाथर्डी, ता कळंब हे दि. 08.04.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे ईटकुर शिवारातील आपल्या शेतात जात होते. यावेळी काकडे कुटूंबातील भाऊबंद- मधुकर, विनोद, कैलास अशा तीघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन दगड, कुऱ्हाडीने मारहाण केली. मारहाणीमुळे भागवत काकडे खाली पडले असता कैलास याने टाटा इंडीगो कार क्र. एम.एच. 12 एमबी 1203 ही त्यांच्या पायावरुन चालवून त्यांना जखमी केले. यावेळी भागवत काकडे यांचा भाऊ- दिनकर व पुतण्या- ओंकार मदतीस धावले असता त्यांनाही वरील तीघांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या भागवत काकडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा दि. 30.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments