Header Ads

आंबी : औषध फवारणी पंप चोरुन विकल्याने खूनपोलीस ठाणे, आंबी: सुभाष रामा काळे, वय 40 वर्षे, रा. रोहकल, ता. परंडा यांचा मेव्हणा- विनांत्या बिरक्या काळे हा असुन तो गावातच राहतो. सुभाष काळे यांच्या ताब्यातील औषध फवारणी पंप विनांत्या काळे यांनी चोरुन विकल्याने सुभाष काळे यांनी त्याचा जाब विनांत्या यास दि. 19.06.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे रोहकल येथील काळेवाडी पारधी पिढी येथे विचारला. त्यावर विनांत्या काळे याने चिडून जाउन 1)चरण पंडीत शिंदे 2)राघवा ‍शिंदे 3)सनी उर्फ गज्या शिंदे, तीघे रा. आनाळा, ता. परंडा 4)धर्मेंद्र शिंदे 5)सुदर्शन शिंदे 6)निलेश शिंदे, तीघे रा. कौडगांव, ता. परंडा 7)सागर काज्या काळे, रा. साडा, ता. करमाळा यांच्या मदतीने बेकायदेशीर जमाव जमवून सुभाष काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात राघवा शिंदे याने सुभाष काळे यांच्या पाठीत तलवार खुपसून तर, धर्मेंद्र शिंदे याने दगडाने, सागर काळे याने काठीने मारहाण करुन सुभाष काळे यांना गंभीर जखमी केले. भावास मारहाण होत असलेली पाहून बहीण- लाडकी मारहाण सोडवण्यास गेली असता तीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणीत सुभाष काळे हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले आहेत.

अशा मजकुराच्या मलमलबाई रामा काळे (मयताची आई) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आठ आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम- 4, 25, सह म.पो.का कलम- 135 अन्वये गुन्हा दि. 21.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments