Header Ads

उमरगा : लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या भावाकडून भावाचा खूनउमरगा - लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या छोट्या  भावाने मोठ्या  भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मुळज ( ता. उमरगा ) येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
राम मनोहर जेवळे ( वय ३२ ) आणि श्याम मनोहर जेवळे ( वय २५) हे दोघे सख्ख्ये भाऊ. राम हा पुण्यात तर श्याम हा मुंबईत राहतो. दोघेही पेंटिंगचा व्यवसाय करून मुंबई- पुण्यात  जीवन जगत होते. कोरोनामुळे हे दोघे भाऊ गावी मुळज येथे आले होते. 

राम  जेवळे याची पत्नी  माहेरी निघून गेली असून ती नांदावयास येत नाही.  त्यावरून राम हा सतत  चिडचिड करीत होता आणि घरात भांडणतंटे करीत होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजता घरी भांडण सुरु असताना, तो वडिलांच्या अंगावर गेला असता, श्याम जेवळे याने चिडून राम जेवळे याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला.

नेमके काय घडले ? 

मनोहर बाबुराव जेवळे, रा. मुळज, ता. उमरगा हे दि. 06.06.2020 रोजी दुपारी 04.00 वा. सु. मौजे मुळज येथील आपल्या शेतातील गोठ्या समोर पत्नी- चमा व धाकटा मुलगा- शाम यांसह बसले होते. यावेळी मद्यपी असलेला त्यांचा थोरला मुलगा- राम जवळे, वय 32 वर्षे याने तेथे येउन कौटुंबीक वादाच्या कारणावरुन वडील- मनोहर जेवळे यांना छातीत लाथ मारुन मारहाण सुरु केली. वडीलांना होत असलेली मारहाण पाहुन धाकटा भाऊ- शाम याने थोरला भाऊ- राम यास विरोध करताच दोघा भावात झटापट सुरु झाली. या झटापटीत राम हा खाली जमीनीवर पडला असता शामने जवळच पडलेला दगड उचलून रामच्या डोक्यात घातला. यात राम गंभीर जखमी होउन जागीच मयत झाला. अशा मजकुराच्या मनोहर बाबुराव जेवळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शाम जेवळे याच्याविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

 पोलिसांनी श्याम जेवळे यास अटक केली आहे. 

1 comment

Unknown said...

Subject chukichaka takta,lockdown mule Alela ha word chukicha