Header Ads

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा

आ.राणाजगजीतसिंह पाटील यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी



उस्मानाबाद - सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने प्रकृती गंभीर झाल्यावर रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर अथवा लातूर येथे पाठवावे लागत आहे.अशा वेळी रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.त्यामुळे उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे ही अत्यावश्यक बाब असल्याचे अधोरेखित झाली असल्याने उस्मानाबाद येथे उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवा अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.


आ.पाटील यांनी पत्राद्वारे ना.देशमुख यांना उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता आवश्यक त्या सर्व प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे अवगत केले आहे.

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापण करण्याबाबत यापूर्वीच्या सरकारने घोषणा केली होती.आपण देखील याबाबत सकारात्मक राहून सहकार्य करत आहात.केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात देशातल्या ७५ जिल्ह्यात वैद्यकिय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे धोरण आखले आहे यात उस्मानाबादचा समावेश व्हावा अशी उस्मानाबाद करांची अपेक्षा असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.



उस्मानाबाद जिल्हा हा देशातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक आहे.केंद्र सरकारने आकांक्षीत जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष योजना जाहीर केली असून सदर योजनेत आकांक्षीत जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करणे किती गरजेचे आहे हे आ. पाटील यांनी पत्रातून अधोरेखित केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अनुषंगिक प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून सदर वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक इमारती देखील उपलब्ध आहेत.यावर्षी मंजूरी मिळाली तर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया चालू करता येईल.त्यामुळे जिल्ह्याचे संपर्कमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने उस्मानाबाद येथे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याबाबत आग्रही राहून मंजूर करून घ्यावा व तो पुढे केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी आ.पाटील यांनी मंत्री अमित देशमुख यांचेकडे केली आहे.

या अनुषंगाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या १५ दिवसात हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

No comments