Header Ads

उस्मानाबाद : दोन रस्ते अपघात, तरुण मयत


पोलीस ठाणे, वाशी: विनोद रामभाऊ काळे, वय 35 वर्षे, रा. आंजनवती, ता. बीड हे दि. 24.06.2020 रोजी 20.30 वा. सु. बीड ते सोलापूर महामार्गावर रुई फाटा येथे मो.सा. क्र. एम.एच. 23- 7315 चालवत जात होते. दरम्यान विनोद काळे यांच्या मोटरसायकलचा ट्रक क्र. एम.एच. 18 बीए 0136 याच्याशी अपघात झाला. या अपघातात विनोद काळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारकामी दवाखान्यात नेन्यापुर्वी ते मयत झाले. अशा मजकुराच्या मच्छिंद्र गोरख मोरे, रा. आंजनवती, ता. बीड यांच्या फिर्यादीवरुन मयत- विनोद काळे यांच्या विरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): ज्ञानेश्वर भिका पवार, रा. सिडको, जि. नाशिक यांनी दि. 28.06.2020 रोजी 13.00 वा. सु. मौजे चिलवडी शिवारातील रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 18 एए 5535 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून अरविंद दिगंबर जाधव, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद यांच्या म्हशीला धडक दिल्याने ती म्हैस मयत झाली. त्यामुळे अरविंद जाधव यांचे अंदाजे 70,000/-रु चे नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या अरविंद जाधव यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर पवार यांच्याविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments