Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, आंबी: शामल गोलेकर, रा. जेजला, ता. भुम यांना दि. 28.06.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे तिंत्रज शिवारात गावकरी- दत्ता लांडे, मनोहर साबळे, सचिन साबळे, कैलास साबळे, सचिन लांडे या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून रहदारीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शामल गोलेकर यांचे दिर- लक्ष्मण गोलेकर मारहाण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमूद आरोपींनी दगडाने तोंडावर मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शामल गोलेकर यांच्या फिर्यादीवरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: मिनाज शौकत शेख, रा. तांबेवाडी, ता. भुम हे दि. 25.06.2020 रोजी 11.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना हसन निलंगे, समीर निलंगे, बशीर निलंगे, मुन्ना निलंगे, चौघे रा. माणकेश्वर, ता. भुम यांनी मिनाज शेख यांच्या घरी गेले. मागील भांडणाची कुरापत काढून मिनाज शेख यांना शिवीगाळ करुन, काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिनाज शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 28.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: बालाजी किसन सिरस्कर, रा. उमरे गव्हाण, ता. उस्मानाबाद हे दि. 08.06.2020 रोजी दुपारी 12.30 वा. सु. मौजे उमरे गव्हाण येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- संजय चौधरी, चंद्रकांत चौधरी, तुषार चौधरी, पांडुरंग चौधरी अशा चौघांनी बालाजी सिरस्कर यांच्या शेताचा बांध फोडण्याच्या कारणावरुन बालाजी सिरस्कर यांसह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बालाजी सिरस्कर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या (एम.एल.सी.) जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 29.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments