Header Ads

उस्मानाबादच्या कापड दुकानात चोरी, चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Videoउस्मानाबाद -  शहरातील नेहरू चौकातील एका कापड दुकानात एका महिलेची पर्स चोरताना एक चोर महिला सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात  कैद झाली आहे. ३० जून ( मंगळवारी ) रोजी दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार घडला. पोलीस या चोर महिलेचा शोध घेत आहेत.


उस्मानाबादच्या नेहरू चौकातील शंकर ड्रेसेस या कापड दुकानात शिक्षक कॉलनी भागात राहणारी महिला अश्विनी सुरवसे या कपड्याची खरेदीसाठी गेल्या असता, तोंडाला स्कार्प बांधलेली एक चोर महिला या दुकानात  आली आणि  अश्विनी  सुरवसे यांची मोठ्या  पर्सची चैन  उघडून त्यातील छोटी पर्स हातोहात लंपास केली.
या छोट्या पर्स मध्ये जवळपास साडेपाच हजार रुपये होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ही चोर महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अश्विनी सुरवसे यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली असून, पोलीस या चोर महिलेचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ 
उस्मानाबादच्या कापड दुकानात चोरी, चोर महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Video https://www.osmanabadlive.com/2020/06/Osmanabad-Cloth-shop-Theft-cctv-Thief-woman.html
Posted by Osmanabad Live on Tuesday, June 30, 2020

No comments