Header Ads

भाजप : संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनउस्मानाबाद - दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध केला.

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी 'बिहार रेजिमेंट शौर्य दाखवत असताना बाकी रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का' असे भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले.सैनिकांन बद्दल अपशब्द वापरून गलिच्छ राजकारण करणाऱ्या अश्या प्रवृत्ती चा आम्ही देशभक्त म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तीव्र निषेध करतो..

संजय राऊत आपण राजकारण जरूर करा परंतु भारतीय सैनिकांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केलात तर ते भारतीय नागरिक म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाहीत याचाच निषेध म्हणून आज उस्मानाबाद  येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने संजय राऊत याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्च्या जिल्हा सरचिटणीस राहुल काकडे, गणेश इंगळगी, श्रीराम मुंबरे, प्रवीण शिरसाटे प्रकाश पवार, भगवंत गुंड, कृष्णा कुंभार, तानाजी गोरे, अक्षय भालेराव, सतीश चव्हाण, सुजित मगर, वृषभ भिसे, तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

व्हिडिओ पाहा 


No comments