Header Ads

पुण्यात कोरोनामुळे सहाय्यक पोलीस फौजदाराचा मृत्यू


पुणे - पुण्यात कोरोनाचा कहर वाढत असताना पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू  झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.करोनामुळं एखाद्या पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच वेळ आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, पुण्यात करोनामुळं मृत्यू झालेले सहाय्यक पोलीस फौजदार (वय ५८) यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या १२ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हायपरटेन्शन आणि स्थुलपणानं ते ग्रस्त होते, अशी माहिती रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी सांगितले.

No comments