वाशी : पिंपळगावचे आणखी दोन रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. वाशी  तालुक्यातील पिंपळगाव येथील दोघांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता २६ झाली आहे. पैकी चार जण बरे झाले असून, २२ जणांवर उपचार सुरु आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी एकूण सात जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता, त्यात वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील एका सहा वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यानंतर याच मुलीच्या आई वडिलांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. हे तिघे मुंबईहुन गावी आले होते.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 21.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 74 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 व्यक्तींचे  अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व 02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल इनकन्ल्कुजीव आहेत.



           या सहा कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 वाशी, 4 जेवळी व 1 परांडा येथील आहे. तसेच शिराढोण ता. कळंब येथील रुग्ण लातूर येथे गेले असता तेथे स्वॅब तपासणीचा अहवाल पॉजिटिव्ह आला असून तेथेच सदरील रुग्णाचा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे उपचार चालू आहेत. तसेच शिराढोण साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू असून तेथे   कंन्टेटमेंट झेान जाहीर करण्याते आला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 इतकी झाली असून यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 20 इतकी असून  उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 इतकी आहे, असे डॉ. आर. व्ही. गलांडे जिल्हाशल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे.

No comments