डमी प्रवासी- वाहन पाठवून पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीसांची परीक्षा

 

डमी प्रवासी- वाहन पाठवून पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीसांची परीक्षा

 तामलवाडी: तुळजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या  तामलवाडी चेकपोस्टवर पोलीस सतर्क आहेत का ? पोलीस पैश्याच्या आमिषाला बळी पडतात का ? याची परीक्षा दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी डमी प्रवासी पाठवून  घेतली, मात्र चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे त्यांना बक्षीस जाहीर केले.

लॉकडाऊन काळात जिल्हाभर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांची सतर्कता व प्रामाणिकपणा तपासण्याच्या हेतूने दि. 17.05.2020 रोजी तामलवाडी चेकपोस्ट येथे एक डमी प्रवासी असलेले वाहन पाठविले.

 या वाहनातील डमी प्रवाशांनी चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीस असलेले मंदीर सुरक्षा रक्षक यांना प्रलोभण दाखवून, आर्जव- गयावया, विनंती करुन सोलापूर कडे वाहनासह जाउ देण्याचा आग्रह धरला. परंतु यावेळी कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल- सचिन वारे, योगेश कांबळे व त्यांच्या सोबत असलेले मंदीर सुरक्षा रक्षक- गणेश तांबे, महेश गीरी, शेखर ओहोळ यांनी प्रलोभण, विनंतीस बळी न पडता कर्तव्यदक्ष, प्रामाणिक राहुन त्यांना चेकपोस्ट ओलांडून सोलापूर कडे जाण्यास मज्जाव केला. वरील नमुद चेकपोस्ट कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता व प्रामाणिकपणा पाहुनपोलीस अधीक्षक यांनी नमुद दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500/- रु. बक्षीस व नमुद तीन्ही मंदीर सुरक्षा रक्षकांना प्रशंसापत्रे दिली आहेत.

From around the web