सोलापूरहून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह

 
ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा संकटात 

सोलापूरहून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - सोलापूरहून चिखली गावात आलेला एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाला असून, यामुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला आहे. हा पोलीस कॉन्स्टेबल उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत आला होता, हे निष्पन्न झाले असून, नियमानुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली  जाईल, असे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी सांगितले.

सोलापूरहून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह




उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावातील एक पोलीस कॉन्स्टेबल सध्या सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तो दि.२४ एप्रिल रोजी गावाकडे आला होता.सोलापुरात त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर तो कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत आलेला हा पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाल्यानंतर चिखली गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलचे आई- वडील, भाऊ, भावाची पत्नी  आदीना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात  भरती करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे सदर पोलीस कॉन्स्टेबल सोलापुरात ज्या रूमवर राहतो तो रूममेटही कोरोना बाधित निघाला आहे. हा कॉन्स्टेबल जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता गावी आला होता, त्याला कुणाचा वरदहस्त आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.


रेड झोन मध्ये असलेला सोलापूर हा कोरोनाचे हॉटस्पॉट आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. या पोलीस कॉन्स्टेबलमुळे उस्मानाबाद जिल्हा अडचणीत आला आहे. त्या कॉन्स्टेबलच्या संपर्कात कितीजण आले, याचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

दरम्यान, अनधिकृत उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या त्या कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे  पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी सांगितले.

कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्हयाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना काही अधिकारी आणि पोलीस उस्मानाबाद जिल्ह्यात ये - जा करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये जे नियम मोडतात  त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात, मात्र काही अधिकारी आणि पोलिसांचा इतर जिल्ह्यातून  सर्रास वावर होत आहे.

रेड झोन मधून आलेल्या एका  पोलीस कॉन्स्टेबलमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा अडचणीत सापडला असून त्याला उस्मानाबाद जिल्ह्यत प्रवेश देणारे झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत, हे   सविस्तर वाचा ... 

कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ?

From around the web