Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यतील दुकाने अखेर उघडली

अखेर सलून उघडले !

समतानगर, उस्मानाबाद येथील छायाचित्र ...
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यत गेल्या २० मार्च पासून कुलूपबंद असलेली दुकाने अखेर आज उघडली आहेत. उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये असल्याने  सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. मात्र मद्य विक्रीच्या दुकाने उघडण्यास  परवानगी नाकारण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने २० मार्चपासून कुलूपबंद करण्यात आली होती. दोन लॉकडाऊन संपल्यानंतर आज ४ मे पासून तिसरा लॉकडाऊन सुरु झाला आहे. मात्र उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये असल्याने काही अटी आणि शर्ती घालून सर्व दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी यांनी  परवानगी दिली आहे. 

असे असेल वेळापत्रक 

-  दूध, भाजीपाला केंद्रे, भाजीपाला फिरते विक्रेते, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच चालू ठेवण्यात येतील
- जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने, चष्माच्या दुकानाह  २४ तास चालू राहतील.
- जिल्ह्यातील कृषी विषयक बी- बियाणे, खते,  कृषी अवजारे, स्पेयर पार्टस सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील.
- इतर सर्व आस्थापना सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील.
- मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. 

सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
तब्बल दीड महिन्यानंतर सर्व  दुकाने उघडल्यामुळे अनेक दुकानांत गर्दी झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली आहे. अनेकांनी तोंडावर मास्क न लावता तसेच ठराविक अंतर न पाळता दुकानासमोर  उभे असल्याचे पहावयास मिळाले. 

पाहा व्हिडिओ No comments