Header Ads

हाणामारीचे उस्मानाबाद जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): दि.04.05.2020 रोजी 14.30 वा. सु. मौजे येडशी येथे सौदागर पंढरी मोहिते व अन्य 2 व्यक्ती सर्व रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांचा घरगुती- जुन्या भांडणाच्या कारणावरुन अरुण रामराव मोरे रा. ठोंबरे नगर, मुरुड, जि. लातुर यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, , चाकुने मारहाण करुन जखमी केले. एकमेकांच्या वाहनांचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे दि. 04.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, वाशी: दि.04.05.2020 रोजी 15.30 ते 20.45 वा. सु. मौजे पारा येथे शंकर मारुती डगले व अन्य 5 व्यक्ती सर्व रा. पारा, ता. वाशी यांचा जुन्या भांडणाच्या कारणावरुन सखाराम विश्वंभर घरत व अन्य 5 व्यक्ती सर्व रा. पारा, यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. वाशी येथे दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, मुरुम: चंद्रकांत रामा बनसोडे रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे दि. 03.05.2020 रोजी 20.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी होते. यावेळी शेतातील रस्त्याच्या कारणावरुन गावातीलच- गंडाप्पा शिदोरे, शिवानंद शिदोरे, हनुमंत शिदोरे, करबस शिदोरे, बसू आलीसे यांनी बेकायदेशी जमाव जमवून चंद्रकांत बनसोडे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारुन जखमी केले. तसेच चंद्रकांत बनसोडे यांच्या मदतीस पत्नी आली असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चंद्रकांत बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 04.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


पोलीस ठाणे, तुळजापूर: शहाजी भागवत कोळी रा. जवळगा मेसाई, ता. तुळजापूर यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना दि. 03.05.2020 रोजी 10.30 वा. सु. त्यांच्या घरा समोर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- धोंडीबा शिंदे, जगन्नाथ नरवडे, रामचंद्र पवार, अनिल चौधरी यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. यात शहाजी कोळी यांचा डावा हात मोडला. अशा मजकुराच्या शहाजी कोळी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 04.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, लोहारा: संदीप सुभाष मोरे, सुभाष मोरे, हिराचंद मोरे, बाळु मोरे सर्व रा. उंडरगांव, ता. लोहारा यांनी दि. 30.04.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे उंडरगाव येथे आपल्या शेतातून वाहने घेउन गेल्याच्या कारणावरून भाऊबंद- अरुण ग्यानदेव मोरे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरुण मोरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments