Header Ads

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 45 वाहने जप्त


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 30.04.2020 रोजी शहर वाहतुक शाखा- 35, परंडा पो.ठा.- 10 अशी एकुण 45 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन: दि.30.4.2020 रोजी 389 पोलीस कारवायांत 1,01,300/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 196 कारवाया करुन 39,200/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 24 कारवाया करुन 13,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 149 कारवाया करुन 33,100/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 2 कारवाया करुन 2,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
5)कार- मोटारसायकलवर प्रवाशी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारसायकलवर फक्त चालक स्वत:, तर कार मध्ये चालकाशिवाय फक्त एक प्रवासी अशी मर्यादा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुध्द 18 कारवाया करुन 14,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन एप्रील महिन्यात 9,518 कारवाया.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द एप्रील 2020 या महिन्यात मोटार वाहन कायदा-विविध कलम-नियमांनुसार एकुण 9,518 कारवाया केल्या आहेत. यात शहर वाहतुक शाखा- 4,031, तुळजापूर पो.ठा.- 988, आनंदनगर- 877, परंडा- 859, कळंब- 560, उस्मानाबाद शहर- 473, नळदुर्ग- 324, भुम- 288, उमरगा- 197, तामलवाडी- 150, लोहारा- 146, उस्मानाबाद ग्रामीण- 133, वाशी- 95, आंबी- 89, बेंबळी- 86, शिराढोण- 78, ढोकी- 55, मुरुम- 51, येरमाळा- 38 अशी मासीक कारवाई करण्यात आली आहे.

No comments