Header Ads

क्वारंटाईन इसमांचा सार्वजनिक वावर, 3 गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्यात दि.01.05.2020 रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करुन लोहारा येथील शेतात जेवणाची पार्टी करणारे 1)दिपक कोंडाप्पा मुळे 2)हरी मल्लाप्पा लोखंडे 3)प्रताप रामराव घोडके 4)गोपाळ राघवेंद्र संदीकर 5)प्रभाकर मधुकर बिराजदार 6)माणिक मनोहर चिकटे सर्व रा. लोहारा.
            तसेच क्वारंटाईन केले असतांनाही घरा बाहेर ट्रक चालक व्यवसायास जाणारे 1)उमेद शेख 2) अयुब पठाण दोघे रा. आरळी (खु.) ता. तुळजापूर, तर सतीश भोसले रा. गंधोरा, ता. तुळजापूर हे क्वारंटाईन असतांनाही सार्वजकनिक ठिकाणी मास्क न लावता फिरतांना आढळले. अशा प्रकारे त्यांनी शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले यावरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 47 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 01.05.2020 रोजी शहर वाहतुक शाखा- 10, परंडा पो.ठा.- 7, कळंब- 30 अशी एकुण 47 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन- तंबाखुजन्य पदार्थाची विक्री केली, गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, ढोकी: शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन, सागर परदेशी रा. कोंड, उस्मानाबाद हा दि. 1.5.20 रोजी 17.00 वा. सु. शिवाजी चौक, कोंड येथे तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 01.05.2020 रोजी नोंदवण्यात आला

No comments