Header Ads

“लॉकडाउन: छुप्या मार्गाने- विनापरवाना जिल्हा प्रवेश, 5 गुन्हे दाखल.”


उस्मानाबाद  उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने पुढील इसम- 1)किसन बाबुराव खुळे 2)अमृता अशोक शिंदे दोघे रा. भोगलगाव, ता. भुम हे दि. 30.04.2020 रोजी अनुक्रमे पुणे व जामखेड येथून मौजे भोगलगाव येथे आले. तर, 3)दत्तात्रय कांबळे 4)अनिकेत कांबळे दोघे रा. सोलापूर 5)गणेश सुर्यवंशी 6)परमेश्वर रणदिवे दोघे रा. धानुरी, ता. लोहारा हे सर्व दि. 29.04.2020 रोजी अनुक्रमे- सोलापूर- मुंबई- लातुर यथून मौजे धानुरी येथे आले. तर, 7)राहुल आडे 8)राम आडे 9)भाउ राठोड 10)सचिन पवार 11)शिवाजी राठोड 12)सुधीर भंडारकवटे 13) भास्कर आडे 14)दत्ता मुखे 15)शामल मुखे 16)बंटी मुखे सर्व रा. जेवळी (दक्षिण), ता लोहारा हे सर्व दि. 28.04.2020 ते 29.04.2020 कालावधीत बाहेर जिल्ह्यातून मौजे जेवळी (दक्षिण) येथे आले. तर, 17)चेतन भोगील रा. दांडेगाव, ता. परंडा हे दांडेगांव येथे आले. तर, 18)रुक्मीनी गायकवाड 19)भाग्यश्री माने 20)अरविंद माने 21)मारुती गायकवाड तीघे रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद हे सोलापूर येथून बेंबळी येथे आले.
अशा रितीने वरील सर्वांनी लॉकडाउन संबंधी विविध आदेशांचे- कायद्याचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 5 गुन्हे दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments