Header Ads

क्वारंटाईन इसमांचा सार्वजनिक वावर, 9 गुन्हे दाखल


उस्मानाबाद  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.29.04.2020 रोजी मौजे भुसणी येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)प्रविण प्रताप कांबळे रा. भुसणी, ता. उमरगा. तर, 2)वैजीनाथ उत्तम डोंगरे 3) उषा वैजीनाथ डोंगरे दोघे रा. कोथळा, ता. कळंब 4)समीना अरीफ पटेल रा. सर्जापुर, ता. बार्शी हे होम क्वारंटाईन असतांनाही दि. 30.04.2020 रोजी मौजे कोथळा येथे सार्वजनिक ठिकाणी नाका- तोडास मास्क न लावलेले आढळले. तसेच 5)बाबुराव विठ्ठल कवडे 6)बालाजी प्रभाकर पवार दोघे रा. करंजकल्ला, ता. कळंब हे दोघे ही क्वारंटाईन असतांना सार्वजनिक ठिकाणी आढळले.
            तसेच आज दि. 01.05.2020 रोजी बंदी आदेश असतांनाही शिवाजी चौक, कळंब येथे आपापल्या ताब्यातील ॲटोमोबाईल्स दुकान विनापरवाना चालू ठेवणारे 1)रुपेश प्रेमचंद लोढा 2)उमेदमल किसनलाल कुकुलोळ दोघे रा. कळंब. तर, किराणा दुकाने चालू ठेवण्याची वेळ 07.00 ते 11.00 वा. चे उल्लंघन करुन कामगारांना मास्क शिवाय काम करु देउन ‘सोमेश्वर ट्रेडींग कंपनी’ हे दुकान चालू ठेवणारे 3)गणेश बसलींगाप्पा लोखंडे रा. कळंब, तर मुर्टा येथे शासनाने निश्चित केलेल्या वेळे व्यतीरीक्त किराणा दुकान चालू ठेवणारे 4)कुमार भानुदास मोरे 5)ज्ञानेश्वर मधुकर सुरवसे दोघे रा. मुर्टा, ता. तुळजापूर या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 9 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments