Header Ads

नांगर चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: अब्दुल्ला तमीजोद्दीन पटेल रा. शेलगांव (ज.), ता. कळंब यांनी त्यांच्या शेत गट क्र. 87 मघ्ये चिंचेच्या झाडाखाली ठेवलेला डबल पलटी नांगर किं.अं. 28,000/- रु. चा दि. 23.0402020 ते 24.04.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता.

            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- 1)मधुकर अर्जुन काळे 2)सुब्राव लहु काळे 3)विकास बहादुर शिंदे 4)सतीश बहादुर शिंदे सर्व रा. खामकरवाडी पारधी पिढी, ता. कळंब यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला वरील नांगर व चोरी करण्यासाठी वापरण्यात  आलेला ट्रॅक्टर व बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, येरमाळा: रमेश बापुराव मुंढे रा. उपळाई, ता. कळंब यांनी दि. 25.04.2020 रोजी 11.30 वा. सु. उपळाई शिवारात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- अविनाश केशव हरभरे यांना शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. यात अविनाश हरभरे हे बेशुध्द होउन खाली पडले. अशा मजकुराच्या अविनाश हरभरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 01.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, वाशी: समाधान नारायण गायकवाड रा. वाशी यांच्या मालकीच्या वाशी येथील देशी दारु दुकानाचा दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. 02.05.2020 रोजी 01.30 वा. सु. तोडून आतील देशी दारुचे 10 बॉक्स किं.अं. 25,980/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या समाधान गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): प्रेमानंद सपकाळ रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरा समोर लावलेली स्कुटर क्र. एम.एच. 25 एए 2980 ही दि. 30.04.2020 रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा प्रेमानंद सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments