Header Ads

क्वारंटाईन असतांना सार्वजनिक ठिकाणी वावर, 14 व्यक्तींवर गुन्हे दाखल


उस्मानाबाद - दि. 02.05.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून आल्याने क्वारंटाईन केले असतांनाही नाका- तोंडास मास्क न लावता फुलवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी फिरणारे 1)योगेश कोडेकर रा. गडदेवदरी, ता. उस्मानाबाद 2) बेबाई नरवटे रा. दहीटना, ता. सोलापूर, तर नंदगाव येथील जि.प. शाळेत क्वारंटाईन केले असतांना गावात सार्वजनिक ठिकाणी फिरणारे 3)अमोल धोतरे 4)अनिता धोतरे 5)अनिल पवार 6)सुनिल पवार 7)अश्विनी पवार 8)संजय इटकर 9)रेणुका इटकर 10)हनमंत इटकर 11)सुनिता इटकर 12)आरती गुंजे 13)अनिल गुंजे सर्व रा. नंदगांव, ता. तुळजापूर, 14)रत्नशील थोरात रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर या क्वारंटाईन असतांनाही सार्वजकनिक ठिकाणी मास्क न लावता फिरतांना आढळल्या. अशा प्रकारे वरील सर्वांनी शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले यावरुन त्यांच्या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 29 वाहने जप्त.”
उस्मानाबाद  लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 02.05.2020 रोजी, परंडा पो.ठा.- 6, कळंब- 23 अशी एकुण 29 वाहने ताब्यात घेतली आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा.”
 परंडा: 1)हिरालाल जाधव, 2)दत्तात्रय मिरगणे, 3)श्रीपतराव विधाते, 4)अभिजीत शेटे, 5)दिनेश गोरे, 6)जमील मण्यार, 7)प्रकाश गोरे सर्व रा. देवळाली, 8)औंदुबर बारस्कर रा. येरमाळा 9)अशोक भोसले रा. देवंग्रा, ता. भूक 10)मेहबुब शेख रा. भुम 11)शरद धस रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी हे सर्व दि. 02.05.2020 रोजी मौजे देवळाली येथील भागवत गोरे यांच्या शेतात तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य, रोख रक्कम 4,110/- रु. च्या मालासह उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. परंडा येथे गुन्हा दि. 03.05.2020 रोजी नोंदवला आहे.

 “अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) उमराव चव्हाण, बादल चव्हाण, सरदार चव्हाण, लैलाबाई चव्हाण सर्व रा. माळकरंजा, ता. कळंब हे दि. 02.05.2020 रोजी माळकरंजा शेत गट क. 53 मध्ये अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकास आढळले. पोलीसांची चाहुल लागताच ते पळून गेले. त्या ठिकाणाहून गावठी दारु निर्मीतीचा 1,750 ली. द्रव पदार्थ असलेले 9 बॅरल व 50 ली. गावठी दारु (साहित्यासह एकुण किं.अं. 97,900/-रु.) जप्त केली.
2) शिवराज गायकवाड रा. भिमनगर, मुरुम, ता. उमरगा हा दि. 02.05.2020 रोजी मौजे मुरुम येथील रस्त्याने मो.सा. वर दारूची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला. त्याच्या ताब्यातून 30 ली. गावठी दारु वाहतुकीस वापरलेली मोटारसायकल (मो.सा. सह किं.अं. 16,700/-रु.) जप्त करण्यात आली.
3) बाबू राठोड रा. शिवाजीनगर तांडा, दाळींब, विनायक राठोड रा. सेवानगर तांडा, कदेर ता. उमरगा  अजय राठोड, नितीन राठोड दोघे रा. पळसगाव तांडा, ता. उमरगा हे चौघे दि. 03.05.2020 रोजी अनुक्रमे दाळींब येथे शिवाजीनगर तांडा ते चिंचोली (भू) रस्त्याने ॲटो रिक्षा मधे व मोटारसायकलवर दारूची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले. त्यांच्या ताब्यातून एकत्रीत 75 ली. गावठी दारु किं.अं. 7,500/-रु. ची (दोन्ही वाहनासह किं.अं. 57,500/-रु.) वाहनासह जप्त करण्यात आली.
            यावरुन वरील सर्वांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments