Header Ads

“छुप्या मार्गाने विनापरवाना जिल्हा प्रवेश,6 व्यक्तींविरुध्द 3 गुन्हे दाखल.”


उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश बंद आहे. तरीही छूप्या मार्गाने, आडवाटेने विनापरवाना जिल्ह्यात लोक येत आहेत. प्रदीप कांबळे, तानाजी वाघमारे, संतोष गायकवाड, निळकंठ सगर, ओंकार भोसले सर्व रा. होर्टी, ता. तुळजापूर हे हैद्राबाद, मुंबई, पुणे येथून मौजे होर्टी येथे आले.    तर, 1)पंडीत आपण्णा हालसगे 2) महानंदा पंडीत हालसगे दोघे रा. बोरामणी, ता. सोलापूर हे दोघे पती- पत्नी  दि. 04.05.2020 रोजी मौजे लोहारा (बु.) येथे आले. तर, 3)अर्जुन शेटीबा पवार 4)फुलाबाई अर्जुन पवार 5)कृष्णा अर्जुन पवार 6)युवराज अर्जुन पवार सर्व रा. आसु, ता. परंडा हे पुणे येथून आसु येथे आले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना- लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन संबंधीत गावच्या पोलीस पाटील/ ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

संचारबंदी: सार्वजनिक ठिकाणी वावर, दुकान उघडले, 3 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद : मा. जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात दि.03.05.2020 रोजी जनताकर्फ्यु जाहीर असतांना मौजे देवधानोरा येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होउ शकेल असे निष्काळजीपणाचे कृत्य केलेले 1)महादेवी गुणवंत थोरात रा. देवधानोरा, ता. कळंब 2)चंद्रकांत बालासाहेब लोंढे रा. वागदरी, ता. लातुर. तर, जनताकर्फ्यु काळात हनुमान चौक, उस्मानाबाद येथे बेकरी दुकान चालू ठेउन व्यवसाय करणारे 3)दिपक नानासाहेब बचुटे रा. वलगुड, ता. उस्मानाबाद. तसेच, आज दि. 04.05.2020 रोजी नाका- तोंडास मास्क न लावता मौजे रुईभर येथे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपाची कृती करणारा 1) दत्ता नारायण सुरवसे रा. रुईभर, ता. उस्मानाबाद या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 189, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments