Header Ads

“लॉकडाउन: आदेश डावलून किराणा दुकान, केशकर्तनालय उघडले, गुन्हा दाखल.”पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन दत्ता काशिनाथ तोडकरी रा. नेहरु चौक, उस्मानाबाद यांनी दि. 05.05.2020 रोजी नेहरु चौक येथील भुसार मालाचे दुकान ग्राहकांसाठी चालू ठेवले. तर, याच दिवशी विजय अरुण राऊत रा. गणेश नगर, उस्मानाबाद यांनी पाथ्रुड चौक, उस्मानाबाद येथील त्यांचे केशकर्तनालय चालू ठेउन ग्राहकांची गर्दी केली असल्याचे पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


गुटखा बाळगला, 2 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, मुरुम: महंमद अली सलिम जमादार व गुडूसाब अहेमदसाब जमादार दोघे रा. आलुर, ता. उमरगा हे दाघे दि. 28.04.2020 रोजी मौजे केसरजवळगा येथे पोलीस नाकाबंदी दरम्यान गुटखा व सुगंधी तंबाखु किं.अं. 22,280/- रु. चा माल मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 2956 वर अवैध वाहुन नेत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले. तर, हाजीमलंग खरोसे, दौलाप्पा कागे, भालके तीघे रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे  दि. 06.04.2020 रोजी मौजे आलुर येथे पानमसाला व सुगंधी तंबाखु किं.अं. 21,150/-रु. चा शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ बाळगला असतांना मुरुम पोलीस पथकास गस्ती दरम्यान आढळले. अशा प्रकारे वरील व्यक्तींनी शासन प्रतिबंधीत अन्नपदार्थ बाळगल्याने तो माल जप्त करण्यात आला. सदर पदार्थ हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असल्याची खात्री करुन अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपी विरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे दि. 04.05.2020 रोजी दाखल करण्यात आले आहेत.

No comments