Header Ads

“गुटखा बाळगला गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, उमरगा: चंद्रकांत आण्णाप्पा पांचाळ रा. तलमोड, ता. उमरगा हे दि. 15.04.2020 रोजी तलमोड येथे पोलीस नाकाबंदी दरम्यान पानमसाला व सुगंधी तंबाखु असा एकुण 5,250/- रु. चा शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळले. सदर जप्त माल हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असल्याची खात्री झाल्याने अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपी विरुध्द गुन्हा दि. 04.05.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, परंडा: रामलींग सुर्यभान चव्हाण रा. गवळी वस्ती, लोहारा, ता. परंडा यांना दि. 03.05.2020 रोजी 18.15 वा.सु. त्यांच्या घरा जवळ शेतबांधाच्या कारणावरुन भाऊबंद- ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, रेखा चव्हाण यांनी शिवीगाळ करुन, दगड, काठने मारहाण करुन जखमी केले. रामलींग चव्हाण यांची सुन आशा या भांडणे सोडवण्यास आल्या असता वरील सर्वानी त्यांना देखील मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तर याच प्रकरणांत विरुध्द पक्षाचे ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण यांना दि. 03.05.2020 रोजी 17.30 वा. भाऊबंद- रामलिंग चव्हाण, नितीन चव्हाण, स्मिता चव्हाण, आशा चव्हाण, सोनाली चव्हाण यांनी शेतातील ऊसाचा खोडवा काढण्याच्या कारणावरुन मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारी वरुन 2 स्वतंत्र गुन्हे दि. 03.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे, तुळजापूर: दि. 03.05.2020 रोजी 10.30 वा. चे सुमारास मेसाई जवळगा, बसस्थानक येथे धोंडीबा शिंदे यांच्या सोबत शहाजी भागवत कोळी, भागयेश्वर कोळी, अजय कोळी, अजय कोळी, अल्का कोळी सर्व रा. मेसाई जवळगा, ता. तुळजापूर यांचा वाद चालू होता. गावातीच- जगन्नाथ आप्पाराव नरवडे हे तो वाद सोडवण्यास गेले असता शहाजी कोळी व त्यांच्या अन्य 3 साथीदारांनी जगन्नाथ नरवडे यांना शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या जगन्नाथ नरवडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
चोरी.”
पोलीस ठाणे, लोहारा: लक्ष्मण लिंगय्या बुरावार रा. आष्टामोड, ता. लोहारा यांच्या जेवळी येथील देशी दारुच्या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 03.05.2020 रोजी मध्यरात्री तोडून दुकानातील देशी दारुच्या 30 खोकी व बियरची 5 खोकी एकुण किं.अं. 50,000/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या लक्ष्मण बुरावार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 04.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments