Header Ads

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीचे अपहरणउस्मानाबाद (श.): घराजवळच राहणाऱ्या नातेवाईकाकडे जाउन थंड पाणी पिउन येते. असे आईला सांगूण एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि. 23.05.2020 रोजी रात्री 20.00 वा. घरा बाहेर गेली. परंतु ती घरी परतली नाही. कुटूंबीयांनी नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता ती आढळली नाही. यावरुन एका तरुणाने (नाव- गाव गोपनीय) तीला फुस लावून पळवून नेले आहे.
अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 25.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, लोहारा: नागनाथ रंगनाथ गुंड, रा. माळेगाव, ता. लोहारा यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप दि. 25.05.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील सोने- चांदीचे दागिने एकुण किं.अं. 42,000/- रु. चे चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या नागनाथ गुंड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.05.2020 रोजी नोंदवला आहे.

रस्ता अपघात, एक तरुण मयत.”
पोलीस ठाणे, तुळजापूर: नितीन लक्ष्मण सुळे वय 38 वर्षे, रा. मोर्डा, ता. तुळजापूर हे दि. 12.05.2020 रोजी 14.00 वा. सु. मोटारसायकल क्र. एम.एच. 12 सीएन 5828 ही चालवत मोर्डा ते तुळजापूर रस्त्याने येत होते. दरम्यान साधुबूवा मंदीरा जवळील पुलावर समोरुन येणाऱ्या इंडीका कार क्र. एम.एच. 23 वाय 0596 च्या अज्ञात चालकाने नितीन सुळे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात नितीन सुळे हे मोटारसायकलवरुन पुलाखाली जाउन पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर जखम होउन ते जागीच मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय मदत न देता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत इंडीका कारचा अज्ञात चालक घटनास्‍थळावरुन वाहनासह निघुन गेला. अशा मजकुराच्या संतोष कोळेकर रा. मार्डा यांच्या फिर्यादीवरुन इंडीका कारच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 26.05.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, वाशी: रामलिंग घुले, स्वप्नील कोकाटे, सुशांत उंदरे, तुषार उंदरे, माधव बहिर, विकी घुले, अक्षय गायकवाड, आकाश घुले, दत्ता घुले, संतोष उंदरे, राम बहिर व अन्य आठ व्यक्ती सर्व रा. रुई, ता. वाशी यांनी दि. 22.05.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे पिंपळगाव येथे बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून सुधिर प्रताप शिंगटे रा. दहिफळ, ता. वाशी व नातेवाईक- प्रितम पवार या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, साखळीने मारहाण केली. यात सुधिर शिंगटे हे जखमी झाले तर प्रितम पवार यांच्या खांद्याचे हाड मोडले. तसेच नमुद आरोपींनी सुधिर शिंगटे यांच्या स्कॉर्पिओ गाडीचे आर्थिक नुकसान केले.
अशा मजकुराच्या सुधिर शिंगटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 25.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, भुम: जीजाबाई दिलीप देवळकर रा. वालवड, ता. भुम व त्यांचा मुलगा- अविनाश देवळकर हे दि. 19.05.2020 रोजी 19.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर होते. यावेळी गावातीलच भाउबंद- हानुमंत महादेव देवळकर यांनी घरजागेचा वाद उकरुन काढून जीजाबाई व मुलगा- अविनाश या दोघांना शिवीगाळ करुन, डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जीजाबाई देवळकर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 25.05.2020 रोजी नोंदवला आहे.


लॉकडाउन: तंबाखुजन्य पदार्थाची विक्री केली, गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, तामलवाडी: शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन, संतोष नागनाथ गायकवाड रा. धोत्री, ता. तुळजापूर हा दि. 25.05.2020 रोजी 16.30 वा. सु. मौजे धोत्री येथील आपल्या किराणा दुकानात तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 25.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments