अल्पवयीन मुलाचे अपहरण


पोलीस ठाणे, उमरगा: आशिश विष्णु आबाचणे वय 17 वर्षे, रा. बालाजी नगर, उमरगा हा दि. 04.05.2020 रोजी 19.00 वा. सु. त्याच्या राहत्या घरातुन शिवाजी कॉलेज, उमरगा येथील मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी व व्यायामासाठी जातो असे सांगुण गेला होता. तो अद्याप घरी परत न आल्याने कुटूंबीयांनी त्याचा नातेवाईक- मित्रांकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलाचे वडील- विष्णु आबाचणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे. “चोरी.”
पोलीस ठाणे, कळंब: नवनाथ वामनराव शेळके रा. शेळका धानोरा, ता. कळंब यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 9513 (किं.अं. 25,000/-रु.) ही दि. 04.05.2020 रोजी 11.30 वा. सु. सुनिल मार्केट, कळंब येथे लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या नवनाथ शेळके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

रस्ता अपघात, तरुणाचा मृत्यु.”
पोलीस ठाणे, आनंदनगर: उमेश मच्छिंद्र वाघमारे वय 18 वर्षे, रा. रमाईनगर, उस्मानाबाद हा दि. 05.05.2020 रोजी 19.00 वा. सु. आरटीओ कार्यालयाच्या रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होता. दरम्यान रस्त्याच्या वळणावर मो.सा. अनियंत्रीत होउन घसरली. या अपघातात स्वत: उमेश जखमी होउन मयत झाला. तर पाठीमागे बसलेले शशीकांत बाबासाहेब घोडे व संदीप धावारे दोघे रा. उपळा, ता. उसमनाबाद हे दोघे जखमी झाले. अशा मजकुराच्या शशीकांत घोडे यांच्या फिर्यादीवरुन मयत मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments