Header Ads

छुप्या मार्गाने विनापरवाना जिल्हा प्रवेश, पती- पत्नीवर गुन्हा दाखल उमरगा: अनिल सतिश मायाचारी व राधा मायाचारी रा. औराद (गुं), ता. उमरगा हे दोघे पती- पत्नी पुणे येथून छूप्या मार्गाने आडवाटेने विनापरवाना प्रवास करत दि. 17.04.2020 रोजी औराद येथे आले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना- लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन त्यांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 03.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, बेंबळी: संदीप नवनाथ कसबे रा. सुंभा, ता. उस्मानाबाद हे दि. 29.04.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे सुंभा येथील चौकात बोलत थांबले होते. दरम्यान गावातील दरम्यान गावातीलच ओमकार केवळराम, महालिंग केवळराम, ओमकार बुर्ले यांनी भांडणाची कुरापत काढून संदीप कसबे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, तलवारीने हातावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संदीप कसबे यांनी वैद्यकीय उपचारानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, लोहारा: नागनाथ ब्रम्हानंद पाटील रा. वाडीवडगांव, ता. लोहारा यांनी दि. 01.05.2020 रोजी 20.00 वा. सु. त्यांच्या घरा समोर शेतजमीनीच्या भांडणावरुन भाऊबंद- कृष्णा ब्रम्हादंद पाटील यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरुन नागनाथ पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, पंरडा: भागवत बबन तनपुरे रा. जवळा (नि.), ता. परंडा हे दि. 01.05.2020 रोजी 19.30 वा. हात पंपावरुन पाणी घेउन घरी जात असतांना रस्त्यात दादा गवारे यांची मोटारसायल लावलेली होती. ती बाजूस काढण्यावरुन वाद निर्माण होउन गावातीलच- 1) नितीन सांगडे 2) विकास सांगडे 3) गणेश सांगडे 4) कुमार गवारे यांनी गणेश तनपुरे शिवीगाळ करुन लोखंडी सळई डोक्यात मारुन जखमी केले. गणेश यांचा आरडा- ओरड ऐकून आई-वडील मदतीस धावले. त्यांनाही वरील चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश बबन तनपुरे (जखमीचा भाउ) यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, आंबी: प्रकाश गणपत हाटकर, मंडळ अधिकारी हे दि. 01.05.2020 रोजी 21.00 वा. सु. गस्तीस असतांना त्यांना डोंजा, ता. परंडा येथे शासकीय मालकीचे गौण खनिज- वाळू चोरी करत असतांना 1)दिपक सुरवसे 2)ज्ञानेश्वर लावन 3)बापु कसाब 4)किरण सुरवसे 5)शहाजी हाक्के 6)सचिन लावंड 7)हनमंत रोकडे 8)गोरख कसाब 9)दिलीप लावंड हे आढळले. त्या ठिकाणी वाळु खोदून भरण्यासाठी एक एक्सकॅव्हेटर यंत्र (जेसीबी कंपनी) व चार ट्रॅक्टर- ट्रेलर वाळू भरलेल्या स्थितीत (वाळू व वाहनांसह किं.अं. 20,50,000/- रु.) जप्त करण्यात आले. अशा मजकुराच्या मंडळ अधिकारी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्व आरोपीविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): आझाद आबुबकर मुजावर रा. तांदळवाडी रोड, वाशी यांनी त्यांच्या घरा समोर लावलेली हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 के 2435 व नाईवाडी वस्ती, वाशी येथे लावलेली यामाहा कंपनीची मो.सा. क्र. बीएलए 682 या (दोन्हींची किं.अं. 30,000/- रु.) दि. 02.05.2020 रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या आझाद मुजावर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: मुकूंद सुखदेव शिंदे रा. लोणी, ता. परंडा यांच्या राहत्या घराच्या खिडकीतुन दि. 29.04.2020 ते 03.05.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व  रोख रक्कम 2,000/- रु. (एकुण किं.अं. 25,000/- रु.) चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या मुकूंद शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 03.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments