“कोविड- 19 जनजागृती संबंधी उस्मानाबाद पोलीसांची ऑनलाईन प्रश्नावली.”
उस्मानाबाद -  पोलीस दल सदस्य व गावोगावी असलेले कोरोना वॉरियर्स यांच्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर श्री. दिलीप टिपरसे यांच्या संकल्पनेतून कोविड- 19 या साथीच्या आजाराच्या जनजागृती करीता एक ऑनलाईन प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ही ऑनलाईन प्रश्नावली आपण सोडवल्यास आपणास या रोगा विषयी योग्य माहिती मिळुन आपले गैरसमज दुर होतील. 

प्रश्नावली सोडवण्याकरीता


या लिंकवर जाउन आपला ईमेल आयडी नोंदवावा. प्रश्नावलीतील 20 पैकी 12 प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र तयार होउन नोंदवलेल्या ईमेल आयडीवर प्राप्त होणार आहे. तरी अधिकाधीक व्यक्तींनी ही ऑनलाईन प्रश्नावली सोडवावी असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

No comments