अगोदर कर्तव्य, नंतर लग्न !

 
पाडोळी गावचे पोलीस उपनिरीक्षक रवी गुंड हे मुंबईत कोरोना हॉटस्पॉट मध्ये बजावत आहेत कर्तव्य
  
अगोदर कर्तव्य, नंतर लग्न !

पाडोळी - मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट नगरी झाली आहे. अश्या संकट काळात पोलीस कर्मचारी जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत. मूळ पाडोळी ता. उस्मानाबाद गावचे पोलीस उपनिरीक्षक रवी गुंड हे  ताडदेव पोलिस ठाण्यात पोलीस उप-निरीक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे त्याने उद्या २ मे रोजी लग्न होणार होते, पण त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथील पोलीस उपनिरीक्षक  रवी सुरेश गुंड यांचे २ मे ला रिंगणी (ता.औसा) येथील एका युवतीशी लग्न होणार होते,मात्र मुंबईत कोरोना रुग्णाची मोठी संख्या वाढत असल्याने  गुंड यांनी लग्नाऐवजी कर्तव्याला प्राधान्य  देणे महत्वाचे समजले. त्यांनी लग्नाच्या रेशीम बंधनात गुंतून हात पिवळे करण्या ऐवजी त्यांनी मुंबईतील कोरोनाला हारविण्यासाठी  दोन हात केले आहेत.श्री.गुंड यांची मुंबई येथील ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य  रस्त्यावर उद्या (दि २) लग्नाची तारीख असताना ही गाड्या तपासणीचे काम करत आहेत.
अगोदर कर्तव्य, नंतर लग्न !

रवी सुरेश गुंड हे  मे २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेततुन  पोलीस उपनिरीक्षक या पदावर भरती  झाले होते. आपले प्रशिक्षण पूर्ण करून ते मुंबई येथील ताडदेव  पोलीस ठाण्यात रुजू झाले. त्यानंतर लग्नाच्या रेशीम बंधनात गुंतण्यासाठी त्यांनी रिगणी (ता.औसा) येथील दादासाहेब रोंगे यांच्या सुचिता नामक मुलीशी साखरपुडा केला.त्यांची विवाहाचा शुभ मुहूर्त म्हणून २ मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती.मात्र लॉकडाऊन आणि कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहून त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

तसे पाहता माणसाच्या आयुष्यात विवाह सोहळेला अन्यन्य  साधारण महत्व असते,  प्रत्येक व्यक्ती  आपल्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवीत असतो,प्रत्येकाला वाटतं असते आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे,असेच काही स्वप्न फौजदार गुंड यांनी २ मेला स्वतःच्या होणाऱ्या लग्नाबाबत रंगविले होते. मात्र संपूर्ण  जगात आणि देशात कोरोना रोगाने धुमाकूळ घातल्यामुळे लग्नाला महत्व न देता आणि त्यांनी २ मे ला भोवल्यावर न चढता  कोरोनाला संपवून लग्न करण्याचा निर्णय  घेतला आहे.त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रवी गुंड हे  पाडोळी(आ) गावातील पहिले पोलीस उपनिरीक्षक आहेत. 

From around the web