Header Ads

लॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात अडकलेले बिहारमधील विद्यार्थी गावी परतलेउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मुस्लिम समाजातील विद्यार्थाना धार्मिक शिक्षण देणाऱ्या आरबी मदरसा शाळा जवळपास २० आहेत. त्यात शिक्षण घेणारे बिहार मधील विद्यार्थी सुद्धा आहेत. लॉकडाऊनमुळे बिहार मधील जवळपास ११९ विद्यार्थी उस्मानाबादेत अडकले होते.पैकी ९० विद्यार्थाना शासकीय खर्चाने  शुक्रवारी पाठवण्यात आले होते, ते विद्यार्थी आज आपल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. लॉकडाऊनमुळे मदरसा शाळेत शिक्षण घेणारे  बिहारमधील  उस्मानाबादेत अडकलेले  २० आणि ढोकीमध्ये अडकलेले  ७० असे ९० विद्यार्थीना आपापल्या गावी पाठ्वण्यासाठी मसूद शेख, मुक्ती रहेमतुल्ला, निहाल काझी, एम्पियाज बागवान,शाहनवाज सय्यद आदी प्रयत्नशिल होते, या सर्वानी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांची भेट घेऊन समस्या विद्यार्थाची समस्या मांडली होती.


जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ मुंडे यांनी यासंदर्भातील खर्चाला मंजुरी देऊन तात्काळ पाऊले उचलली. त्यासाठी उस्मानाबादचे तहसीलदार माळी  यांनी परिश्रम घेतले. अखेर ९० विद्यार्थाना शासकीय खर्चाने उस्मानाबाद ते औरंगाबाद राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणि तेथून ट्रेनने बिहारला पाठवण्यात आले. शुक्रवारी निघालेले हे विद्यार्थी बिहारमधील आज आपापल्या गावी पोहोचले. त्याबद्दल पालकांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांना धन्यवाद दिले आहेत तसेच उस्मानाबादचे सामाजिक कार्यकर्ते मसूद शेख यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

पाहा व्हिडीओ 


No comments