Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे पासून सर्व व्यवहार सुरु होणार ?

ग्रीन झोन साठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी


उस्मानाबाद - राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.  या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला आहे. रेड झोन मध्ये कोणत्याही अटी शिथिल नाहीत ,पण ग्रीन झोन मध्ये सर्व व्यवहार सुरु होणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत कोरोना बाधित एकही रुग्ण सापडलेला नाही आणि सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित  रुग्ण नाही, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या ४ मे पासून खालील व्यवहार सुरु होऊ शकतात.


ग्रीन झोन मधील व्यवहार

● ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील.
मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत.

● अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.

● प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी.

● बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल.

● राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.

● उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये असल्याने केशकर्तनालय (सलून) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे

  मद्यविक्रीला परवानगी 

 बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे

सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

 गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या,  ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात  आले आहेत.

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.

– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.
19 comments

Unknown said...

काही उपयोग होणार नाही 15 दिवसांनी काही फरक पडणार नाही , सोशल distincing होऊ शकणारच नाही झोन चा कलर बदलायला वेळ लागणार नाही , तस ही फार मोठे उद्योग नाहीत जिल्ह्यातील की अर्थकारण फिरेल म्हणायला,

Unknown said...

सर्व मार्केट इतर जिल्ह्यावर अवलंबुन आहे उस्मानाबाद चे त्यामुळे फार काही मोठा फायदा कुणालाच होणार नाही उलट संक्रमन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही

Unknown said...

उलट संक्रमण वाढणार

Unknown said...

सर्व मार्केट इतर जिल्ह्यावर अवलंबुन आहे उस्मानाबाद चे त्यामुळे फार काही मोठा फायदा कुणालाच होणार नाही उलट संक्रमन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही

Unknown said...

Lock dwan kadun payavar dhonda marun ghetalyasarkha Aahe!!!!!!!

Unknown said...

खूप अवघड आहे असे झाले तर

Unknown said...

Lockdown kadhu nye

Unknown said...

लॉक डाउन के नियम सर्वानी पाऴले पाहिजेत

Unknown said...

राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी फक्त दारूचे दुकान चालू केले असते तरी ठिक झाले असते ईतर मोकळीक काही कामाची नाही

Unknown said...

सर्व मार्केट दुसऱ्याजिल्हा वर अवलंबून आहे त्या मुळे फायदा होनार नाही उलट मेंटेनन्स वाढेल

Unknown said...

बंदच ठेवलेले बरे पंधरा दिवसांनी काहीही फरक पडनार नाही लोक जनावरा सारख फिरनार

Unknown said...

बंदच ठेवलेले बरे पंधरा दिवसांनी काहीही फरक पडनार नाही लोक जनावरा सारख फिरनार

Creations said...

Abhi lock down khol ke kuch khaas fayeda nahi hone wala.

Unknown said...

उस्मानाबाद मधील सर्व लोकांनी काळजी घेतली व थोडा त्रास सहन केला तसा अजुन थोडा सहन करुत व अजुन लॉक डाऊन कालावधी आहे ठेवधा ठेवावा व जीवनावश्यक दुकानान थोडा वेळ वाढवून द्यावा.

Unknown said...

सर्व काही ठिक आहे या भ्रमात राहु नये, फक्त जिल्हा अंतर्गत व्यवहार चालू ठेवले तर बरे होईल.

Unknown said...

खुप मोठा अनर्थ होईल

Unknown said...

लोकं मोकाट फिरतात त्यामुळे धोका शंभर टक्के नाकारता येत नाही

Unknown said...

वयक्तीक डिंस्टस ठेवून व्यवहार करण्यास कांही हरकत नाही, मजुरांची अवस्था फार बिकट होत चालली आहे

Unknown said...

Kirana dukanachi time kiti ahe ?
7to 6 pm ka ???