Header Ads

उस्मानाबाद प्रशासनाचे हेल्पलाइन नंबर बंद


उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने जे हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत, ते सर्वच्या सर्व बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उस्मानाबादचे जिल्हा प्रशासन अडचणीत सापडलेल्या नागरिकांची फसवणूक करीत आहेत, हे उघड आहे.


लॉकडाऊनमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक अडकले आहेत. तसेच अनेकांना उस्मानाबाद जिल्ह्यत यायचं आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर उस्मानाबाद जिल्हा  प्रशासनाने काही हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. त्यात काही अधिकाऱ्यांचे नंबर आहेत. हे नंबर एक तर बंद आहेत किंवा लागत नाहीत, त्यामुळे अडकलेले लोक आणखी  त्रस्त झाले आहेत. तसेच जो ऑनलाईन फॉर्म देण्यात  आला आहे, त्यात डॉक्टरचे प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. ते आणण्याचे कुठून? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  उस्मानाबाद प्रशासनाने जे हेल्पलाइन नंबर  दिले आहेत, ते बंद असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी उस्मानाबाद लाईव्हकडे केल्या असता, उस्मानाबाद लाइव्हने सर्व नंबर लावून बघितले असता, सर्व नंबर बंद असल्याचे क्रॉस चेक मध्येही आढळून आले आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांची एकप्रकारची फसवणूक करीत आहे,

यापूर्वी दिलेल्या बातमीत हे हेल्पलाइन नंबर आहेत..

उस्मानाबाद जिल्ह्यात यायचंय किंवा जायचंय ?


2 comments

Nilesh said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

नंबर बंद किंवा उचलत नाहीत पण तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे किंवा माहिती नाही अशी उत्तरे मिळाली.