Header Ads

गुड न्यूज : चिखलीतील चारही रिपोर्ट निगेटिव्ह

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये  कायम 


उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील उर्वरित चौथा रिपोर्टही निगेटिव्ह आले असून, चारही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये राहिला आहे.  

सोलापुरात ड्युटी करणारा चिखली गावातील एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती, त्यानंतर त्या पोलिसांच्या आई, वडील, भाऊ, भावजय या चौघांचे  स्वॅब तपासणीसाठी सोलापुरात पाठवण्यात आले होते. पैकी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते तर  एक रिपोर्ट पेंडिंग होता, तोही रिपोर्ट रात्री बारा वाजता आला असून, तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये कायम राहिला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण नाही. उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. परंतु चिखली गावातील एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे संकटाचे ढग जमा झाले होते.  

कोरोना बाधित पोलिसाच्या आई, वडील, भाऊ आणि भावजय यांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेट  करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये  कोरोनाची लक्षणे आढळलेली नव्हती, त्यात चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत 

No comments