धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्ण वाढले

 
कळंब तालुका झाला हॉटस्पॉट 

धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्ण वाढले


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. कळंब तालुक्यातील हावरगाव येथील दोन महिला आणि भूमच्या एका पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता सात झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील पती - पत्नी आणि कळंबचा एक महसूल कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर कळंब  तालुक्यातीलच हावरगावच्या २५ ते ३० वयोगटातील दोन महिलांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने या तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या 5 झाली असून, कळंब तालुका कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. 

तसेच परंडा तालुक्यातील सरणगाव येथील एक टेम्पो चालक कोरोना बाधित होता. आता भूम तालुक्यातील पन्हाळवाडीच्या  एका  ३४ वर्षाच्या पुरुषाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. आज पॉजिटीव्ह आलेले तिन्ही रुग्ण मुंबईहुन गावी आले होते.



जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 799 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 168, तुळजापूर 145, उमरगा 206, लोहारा 52, कळंब 145, वाशी 11, भूम 19, परंडा 53 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 748 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 28 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 17 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. 

 तसेच परंडा 1, कळंब 3 व उमरगा 2, येथील व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील 1 अहवाल मुंबई येथे तपासणी करण्यात आलेला आहे. सदयस्थितीत 7 रुग्णांपैकी उमरगा व लोहारा येथील 3 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व 2  रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे उपचार घेत आहेत तसचे 1 रुग्ण परंडा येथील उपजिल्हा रुग्णालायामध्ये उपचार घेत आहेत.  कळंब येथील 1 रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि 15 मे रोजी शासकीय वैदयकीय महाविदयालय सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.  

From around the web