चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३५ 

चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह


उस्मानाबाद _ उस्मानाबाद जिल्ह्यातील आज सहा जणांचा कोरोना  रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा ३, उस्मानाबाद २ आणि परंडा १ असा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची  संख्या आता  ३५  झाली आहे. पैकी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३० जण उपचार घेत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यत सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत. तालुकानिहाय रुग्ण असे. उमरगा - ८, कळंब -७, परंडा -६, लोहारा- ५, उस्मानाबाद - ३, वाशी -३, भूम - २, तुळजापूर - १

आज ज्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे, ,त्यात कुकडगाव, ता, परंडा येथील एक महिला आहे, ती दहिसर, मुंबई येथून गावी आली होती. तसेच उमरगा शहरातील दोघे असून, दोन्ही पुरुष आहेत तर केसरजवळगा येथील एक महिला आहे.तसेच उस्मानाबाद शहरातील दोन पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून ते सोलापुरातून उस्मानाबादेत आल्याचे समजते.





जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत दिनांक 23 मे 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल  Inconclusive आले आहेत., अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.



          जिल्ह्यात आज सहा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी उस्मानाबाद शहरातील दोन रुग्ण असून त्यातील एक रुग्ण देशपांडे स्टॅन्ड जोशी गल्ली येथील असून तो सोलापूर येथून आलेला आहे. तर दुसरा रुग्ण धुता तालुका उस्मानाबाद येथील तीस वर्षे महिला असून ती मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. उमरगा तालुक्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्ण असून यामध्ये उमरगा शहरातील दोन रुग्ण आहेत व ते पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले होते तर एक उमरगा तालुक्यातील कासार जवळगा या गावातील रुग्ण आहे होतो मुंबईतून प्रवास करून आलेला आहे. तर सहावा पॉझिटिव्ह रुग्ण हा  परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 इतकी झाली असून त्यातील उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या 29 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

हे नक्की वाचा ...  उस्मानाबाद जिल्हा : ग्रीन झोन ते रेड झोन !

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 4 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चारही रुग्ण काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत व एम. आय. डी. सी. हडको येथील असून त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  44 व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन  5 व्यक्तींचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. अहमदपूर  येथुन 11  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी 06  व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत   व 3  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. निलंगा येथून 5 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  सर्वच 5 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  कासारशिरसी येथील 5 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील  एकुण 110 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 93 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 6 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.




 तसेच बीड जिल्हयातील 40 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 33 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे.   उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल  Inconclusive आले आहेत  .



   असे एकुण आज 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 161 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  23 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 13 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive)  आले आहेत व  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

From around the web