धक्कादायक : आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची चिखली वारी

 
धक्कादायक : आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची चिखली वारी


उस्मानाबाद :  रेड झोन सोलापूरहून चिखली गावात आलेला  एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाला होता.  त्यांच्या संपर्कात आलेला  त्याच्याच गावचा आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल चिखली गावात येऊन गेल्याचे उघड झाले असून, त्यास बार्शीमध्ये होम क्वारंटाइन कऱण्यात आले आहे. तसेच या दोघांच्या संपर्कात आलेल्या १५ जणांना देखील  गावात  क्वारंटाइन  करण्यात आले आहे.  दरम्यान चिखली गाव प्रशासनाने पूर्णपणे सील केले आहे. 

सोलापूरहून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावातील कोरोना बाधित  पोलीस कॉन्स्टेबल सोलापूर मुख्यालयात कार्यरत आहे. त्याची ड्युटी बार्शी पोलीस स्टेशन अंतर्गत देण्यात आली होती, तो चिखली गावातील रहिवासी असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या रूमवर मुक्कामास होता, संपर्कात आलेला तोच पोलीस कॉन्स्टेबल चिखली गावात येऊन गेल्याची माहिती प्रशासनास मिळाली आहे. त्यास बार्शीमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.


या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या चिखली गावातील १५ जणांना  क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच घरोघरी आरोग्य कर्मचारी फ्ल्यू, न्यूमोनिया लक्षणे असलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करीत आहेत. दरम्यान चिखली गाव  पूर्णपणे सील करण्यात आले आहे.  खबरदारी म्हणून त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील, आई, भाऊ व भावजय यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले  आहे. त्यांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट आज रात्री उशिरा येणार आहे. दरम्यान चाैघांनाही कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. कोरोना आढळल्यास कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येतील.

चिखली चिखलात घालणार ? 


धक्कादायक : आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची चिखली वारी


उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्याला शिथिलता देण्याबाबतचे प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असतानाच सोलापूरमध्ये कोरोना बाधित  आढळलेला पोलिस कर्मचारी त्याच्या मूळ गावी चिखली (ता. उस्मानाबाद) येथे २४ एप्रिलला आपल्या कुटुंबीयांना भेटून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील ४ व्यक्तींना प्रशासनाने शनिवारी (दि.२) दुपारी उस्मानाबादेत आयसोलेट केले. त्यांच्या स्वॅबचे नमुने सोलापूरला  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, आज रात्री उशिरा त्यांचा अहवाल येईल. या अहवालावरच जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहणार की ऑरेंज झोनमध्ये जाणार,याबद्दलचे भवितव्य अवलंबून आहे.


उस्मानाबाद लाईव्हचे सवाल 

  1.  सामान्यांना जिल्हा बंदी असताना दोन पोलिस कर्मचारी जिल्ह्यात बिनदिक्तपणे कसे येऊ शकतात,त्यांनी परवानगीची गरज नाही का ?
  2. पोलीस अधीक्षक सूचना असतानाही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला जिल्ह्यात प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही ?
  3. चिखली गावात आल्यानंतर सहायता कक्षामध्ये कर्मचाऱ्याने नोंद का केली नाही, पोलिस पाटलांनी तक्रार का दिली नाही? बेंबळी पोलीस गोट्या खेळत होते का ?
  4.  जिल्ह्यात अशाप्रकारे किती पोलिस कर्मचारी ये-जा करतात, याची नोंद पोलिस विभागाकडे आहे का?
  5.  जिल्हा बंदीमुळे चेक पोस्टवर पोलिस बंदोबस्त असतानाही दोन पोलीस लोक जिल्ह्यात कसे येऊ शकतात ?.
  6. . पोलीस खात्यातील झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत? त्यांच्यावर काय कारवाई होणार ?
हेही नक्की वाचा 

कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ?

From around the web