उस्मानाबाद जिल्ह्यात ढाबे सुरु करण्यास परवानगी
  उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर असलेले ढाबे  सुरु करण्यास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना काही अटीचे पालन करण्याची सूचना केली आहे.

धाब्यावर असलेल्या स्वयंपाकगृहामध्ये वारंवार आवश्यक ती स्वच्छता व निर्जतूकीकरण करणे बंधनकारक असेल. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तीक स्वच्छता राखणे, मास्क, हॅन्डग्लोज, गॉगल सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. धाबामध्ये पर्यावरण पुरक (environment friendly) व नष्ट करता येऊ शंकतील अशा (disposable) प्लेट्स, ग्लास, बॉटलस इत्यादीचा वापर करावा. वैद्यकीय निकषानुसार निश्चीत केलेले सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने  आवश्यक मार्कींग करण्यात यावे. धाबा चालू ठेवण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. धाब्यावर गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात यावी. धाब्यावर जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तीना हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण, पाणी इत्यादी उपलब्ध करून देण्यात यावे. वेळोवेळी शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे धाबाचालकावर बंधनकार राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच “ महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे. 


आहे आहेत अटी आणि नियम ? 


No comments