नळदुर्ग : गोवंश कत्तलखान्यावर छापा, गुन्हा दाखलउस्मानाबाद -  गोवंशीय कत्तलीस बंदी असतांनाही नळदुर्ग, ता. तुळजापूर येथे अवैध कत्तलखाना चालू होता. याची गोपनीय माहिती मिळाल्याने  पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे, स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज ६ मे रोजी सदर कत्तलखान्यावर पो.ठा. नळदुर्ग व स्थागुशा यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.
 घटनास्थळी सुमारे 850 कि.ग्रॅ. गोवंशीय मांस, कत्तलीचे साहित्य व गोवंशीय व म्हैस अशी 20 जनावरे असा एकुण 5,89,250/-रु. चा माल महेबुब सादिक कुरेशी व त्याचे अन्य 7 सहकारी यांच्या ताब्यात आढळल्याने त्यांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ),9 (अ) व अन्य इतर कायद्यानुसार गुन्हा दि. 06.05.2020 रोजी दाखल करण्यात आला. या कारवाईत सपोनि  वानखेडे पोउपनि श्री. लहाणे, पोउपनि श्री. खोडेवाड, पोहेकॉ- रोकडे, पोना- कुनाल दहिहंडे, गव्हाणे, पोकॉ- पांडुरंग सावंत, लाव्हरेपाटील, ठाकुर व पो.ठा. नळदुर्गचे इतर कर्मचारी यांनी भाग घेतला.

2 comments:

  1. अभिनंदन खुप अभिनंदन नळदुर्ग उस्मानाबाद पोलिस.

    ReplyDelete
  2. Sadiavtaha kaydyache rajya aasave.!!!!!!!!!

    ReplyDelete