आष्टामोड : दारूचे दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्याना मुद्देमालासह अटकउस्मानाबाद - लॉकडाऊन काळात दारू विक्री बंद असल्यामुळे तळीराम तळमळ करीत आहेत. अश्यात दारूचे दुकान फोडण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहे. आष्टामोड येथील दारूचे दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मण लिंगय्या बुरावार रा. आष्टामोड, ता. लोहारा यांच्या जेवळी येथील देशी दारुच्या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 03.05.2020 रोजी मध्यरात्री तोडून दुकानातील देशी दारुच्या 30 खोकी व बियरची 5 खोकी एकुण किं.अं. 50,000/- रु. चा माल चोरुन नेला होता. यावरु दि. 04.05.2020 रोजी पो.ठा. लोहारा गु.र.क्र. 105/2020 कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

            सदर गुन्हा तपासत चोरीस गेलेला मुद्देमाला पैकी किंगफिशर कंपनीच्या बिअरच्या 32 बाटल्या (एकुण किं.अं. 5,280/-रु.) व दारु विक्री केलेली रक्कम 7,500/-रु. असा एकुण 12,780/- रु. च्या मालासह आरोपी- 1)विठ्ठल शिवाजी माने 2)अजहरुद्दिन अब्दुल शेख दोघे रा. जेवळी, ता. लोहारा यांना ताब्यात घेतले. हि कारवाई स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, कावरे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, यांच्या पथकाने करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

No comments